राजेंद्र पाटील राऊत
नांदगाव शहरात संस्थेच्या माध्यमातून निराधार परिवारास दिपावली निमित्त मदत नांदगाव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
नांदगांव शहरातील श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्वर्गीय सरस्वती इच्छाराम धामणे महिला बउद्देशीय संस्था यांच्या वतीने निराधार व्यक्तिस दीपावली निमित्ताने मदत करण्यात आली
स्वराज्यात शिवा काशी यांनी स्वताचे बलिदान देवुन श्री छत्रपति शिवाजी महाराज यांना वाचविले आज रयत आदराने बोलते की शिवा काशिद अमर हे ..असाच एक प्रकार नांदगांव येथील नविन तहसिल कार्यालयच्या मागे किशोर मधुकर चव्हाण गाई चारत असतांना त्याच्या समोर एक व्यक्ति पाण्यात बुडत असतांना दिसला त्या व्यक्तिस वाचविण्यात यश आले परंतु स्वंताचा प्राण गमवावा लागला अश्या वीराच्या धर्मपत्नीस ललिता चव्हाण यांच्या परिवारास दिपावलीची भेट म्हणून धान्य साडी चोऴी कपडे मिठाई व रोख रक्कम देण्यात आली या वेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल धामणे , प्रतिष्ठित व्यापारी शाम पारख , महिला बहुदेशीय संसथेच्या उपाध्यक्षा सुशिला पारख , कामगार यूनियन सेना अध्यक्ष वामन पोतदार,मंत्रांल्यातील अमोल पारखे, जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, रमाकांत सोनवणे ,जटा चायनलचे धनंजय गोजरेकर,सोमन जोशी ,व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते