Home मुंबई शॉक लगा लगा….! दिवाळी आधीच बॉलिवूडकरांच्या घरी फुटले वीजबिलाचे फटाके 🛑

शॉक लगा लगा….! दिवाळी आधीच बॉलिवूडकरांच्या घरी फुटले वीजबिलाचे फटाके 🛑

468

राजेंद्र पाटील राऊत

🛑 शॉक लगा लगा….! दिवाळी आधीच बॉलिवूडकरांच्या घरी फुटले वीजबिलाचे फटाके 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

चंदेरी दुनियेत :⭕ लाईट ही सगळ्यांचीच मूलभूत गरज आहे. मात्र भरमसाट लाईट बिल आलं की ते भरणं सर्वसामान्यांच्या जीवावर येतं. बिल कमी आलं तर सामान्य नागरिक खुश आणि जास्त बिल आलं तर वीज कंपनीला शिव्यांची लाखोली वाहतात. पण या सगळ्यांपासून बॉलिवूडकर मात्र दूर आहेत.

त्यांची लाईट बिलांची रक्कम ऐकून तुमचा फ्यूज नक्की उडणार आहे.

सेलिब्रिटींचं महिन्याला लाईट बिल नक्की असतं तरी  किती..?

१) शाहरुख खान – तर शाहरुखचं महिन्याचं लाईट बिल ४५ लाख रुपये आहे.

२) सलमान खान – दबंग सलमान खानच लाईट बिल हे त्याच्यासारखंच दबंग आहे. तो महिन्याला २५ लाख रुपये लाईट बील भरतो.

३) कतरीना कैफ – मुंबईत राहणारी कतरीना महिन्याला १० लाख रुपये लाईट बिल भरते.

४) दीपिका पदुकोन – तर बॉलिवूडच्या पद्मावतीला महिन्याला १३ लाख रुपये लाईट बिल येतं.

५) आमिर खान – वांद्रयाला राहणाऱ्या आमिरचं महिन्याचं लाईट बिल २२ लाख रुपये आहे.

६) सैफ अली खान – तर सैफच्या नुसत्या केबिनचं लाईट बिल महिन्याला 30 लाख रुपये आहे.

बॉलिवूडकरांचं  भरमसाट लाईट बिल चर्चेचा विषय बनला आहे. या बिलांची रक्कम ऐकून सर्वसामान्यांचा ‘फ्यूज’ उडेल.

सर्वाधिक लाईट बिलात शाहरुख खान अव्वल असल्याचं आढळून आलं आहे. या कलाकारांच महिन्याला लाखो रुपयांचं लाईट बिल आहे.

*कलाकारांच्या लाईट बिला एवढं सामान्यांच 10 वर्षांचं बजेट* ⭕

Previous article🛑 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा -रुपाली चाकणकर यांची नाशिक पोलिस आयुक्त आणि अधीक्षक कार्यालयास भेट 🛑
Next articleमुंबई लोकलमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी…! हा महत्वाचा निर्णय 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.