Home नांदेड पिकविम्यासाठी सोयाबीन पिकाचा समावेश – जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

पिकविम्यासाठी सोयाबीन पिकाचा समावेश – जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

198

राजेंद्र पाटील राऊत

पिकविम्यासाठी सोयाबीन पिकाचा समावेश – जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हयामध्ये 4 लाख 34 हजार 251 हे. क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी झाली आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांनी सोयाबिनचा पिक विमा काढलेला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबिन पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. विमा कंपनी व कृषि विभाग नुकसानीचे पंचनामे करत आहे. येत्या 3 ते 4 दिवसात पंचनामे पुर्ण करण्यात येणार असून, विमा कंपनी इतर पिकांसोबत सोयाबिन पिकाची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

संभाव्य अवकाळी पावसापासुन पिकाचे नुकसान होणार नाही यादृष्टीने शेतकऱ्यांनी सोयाबिन जर हाती लागले असेल तर अशा काढणीला आलेल्या सोयाबिन पिकाची 15 ऑक्टोबर पुर्वी काढणी करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. काही वृत्तपत्रामध्ये 8 ऑक्टोंबर 2021 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीत पिक विमा आगाऊ मिळणेसाठी नांदेड जिल्हयामध्ये सोयाबीनचा उल्लेख केलेला नसल्याचे दिसून आले. यामूळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या व कृषी विभागाच्या वतीने ही वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

Previous articleशांतता समिती बैठक विविध संस्था; संघटनांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी अरोरा
Next articleप्रा. मारोती लक्ष्मणराव सोनकांबळे यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.