राजेंद्र पाटील राऊत
वाखारी ते देवळा बससेवा सुरु करण्याची ग्रामस्थां ची मागणी
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे/युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी ता देवळा येथुन देवळा शहरात जाण्यासाठी वाखारी ग्रामस्थांनी खाजगी प्रवासी वाहतुक बंद करून एक गाव एक बस सेवा सुरु केली होती परंतु कोरोना काळ व लॉक डाऊन च्या पार्श्वभुमीवर गेल्या दिड वर्षापासून हि बस सेवा बंद होती पंरतु लॉक डॉऊन शितील केल्याने आता आठवडे बाजार सुरु झाल्याने व शाळा व महाविद्यालय सुरु झाल्याने वाखारी ते देवळा हि बससेवा सुरु करावी या मागणी साठी ग्रामस्थ व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने आज मंगळवार दिनांक 5-10-2021 रोजी मा. आगार व्यावस्थापक सो देवळा विभाग ता देवळा यांना राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुनील (आबा )आहेर व जि प सदस्या मा डॉ नुतन ताई आहेर यांच्या मार्गदशनाखाली निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देतांना राष्ट्रवादी युवक ता सरचिटनीस शैलेश पवार सोशल मिडीया ता अध्यक्ष सनी आहे सुनिल आहेर शिवाजी पवार केदा पवार इतर ग्रामस्थ व पक्षाचे कार्यकरते उपस्थीत होते