Home कोल्हापूर कोल्‍हापूर : स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या

कोल्‍हापूर : स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या

334

राजेंद्र पाटील राऊत

कोल्‍हापूर : स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या
सांंगली,(शरद चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने नैराश्येतून गजानन धोंडिराम गुरव (वय 23, रा. जाखले, ता. पन्हाळा) या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्‍याने तरूणाने जीवन संपवल्‍याने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

जाखले येथील गजानन गुरव याने तीनवेळा स्पर्धा परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला अपयश आले होते. त्यानंतर त्याने दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेत गजाननाला दोन विषयांमध्ये कमी गुण मिळाल्याने तो चार दिवसांपासून नाराज होता.

या नैराश्यातून त्याने आपल्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून आत्महत्या केली. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे. त्याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे.

Previous articleबोर नदीपात्रात बुडून महिलेचा
Next articleकृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज.५ ऑक्टोंबरला पिक विमा संदर्भात आज बैठक संपन्न यामध्ये सकारात्मक तोडगा .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.