Home विदर्भ अकोला जिल्ह्यात क्रीडा नैपुण्य चाचणीस प्रारंभ

अकोला जिल्ह्यात क्रीडा नैपुण्य चाचणीस प्रारंभ

334

राजेंद्र पाटील राऊत

अकोला जिल्ह्यात क्रीडा नैपुण्य चाचणीस प्रारंभ

अकोला:- ( सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्युट यांचेकरीता क्रीडा नैपुण्य चाचण्यांना आज वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर बुढन गाडेकर, बॉक्सींग प्रशिक्षक सतीषचंद्र भट, कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव, कबड्डी व खो-खो प्रशिक्षक विजय खोकले उपस्थित होते.

आज पहिल्या दिवशी बॉक्सींग खेळाचे एकूण 70 खेळाडू उपस्थित होते. आज खेळाडूंची 50 मीटर, 1 हजार मीटर, 2 बाय 10 मीटर शटल रन, पुशअप, सिटअप चाचणी घेण्यात आली. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे येथे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे येथे चाचणी परत द्यावी लागेल. आजच्या या चाचणीमध्ये सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सींग या खेळाचे तज्ञ म्हणून चाचणीसाठी आदित्य मने, गजानन कबीर यांनी कार्य केले. तसेच निशांत वानखडे, राजू उगवेकर, अनुप वर्मा, अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे, अशोक वाठोरे यांनी चाचणी यशस्वी करण्याकरीता कार्य केले.

Previous articleकेंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा मास्टर प्लान हॉर्न
Next articleवाई येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.