राजेंद्र पाटील राऊत
ठाण्यामध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार: कोरोना लसीऐवजी दिले रेबीजच इंजेक्शन,डॉक्टर- परिचारिका निलंबित
ठाणे : ( अंकुश नारायण पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज चॅनल)
ठाणे महानरपालिकेच्या कळवा आरोग्य केंद्रात एका व्यक्तीलाकोरोना लसीऐवजी दिले रेबीजच इंजेक्शन,डॉक्टर- परिचारिका निलंबित करण्यात आले आहे.
संबंधित परीचारिकेने त्या व्यक्तीची कोरोना कागदपत्रांची. पाहणी न करता थेट रेबिजच इंजेक्शन दिल्याचं काहीवेळाने समोर आले.
महापौर नरेश म्हस्के यांना आज ही बातमी समजाच तात्काळ महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांची बैठक बोलावली होती, त्या डॉक्टर आणि परीचारीकेला आता निलंबित करण्यात आले आहे. सदर व्यक्तीची प्रकृती आता स्तिर असल्याचे समजते.