Home मुंबई महाराष्ट्र एटीएस ची मोठी कारवाई, संशयित दहशतवादी ताब्यात!

महाराष्ट्र एटीएस ची मोठी कारवाई, संशयित दहशतवादी ताब्यात!

190

राजेंद्र पाटील राऊत

महाराष्ट्र एटीएस ची मोठी कारवाई, संशयित दहशतवादी ताब्यात!

मुंबई – (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज नेटवर्क)

० मुंबई पोलिस क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएस ला यश आले आहे.

० या संशयित दहशतवाद्याचे नाव झाकीर असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळून लावला होता व ६ दहतवाद्यांना अटक केली होती. त्याच पार्श्वभूमीवर झकिरला ताब्यात घेत्याचं समजत आहे.

० महाराष्ट्र एटीएस च्या नागपाडा कार्यालयामध्ये कालपासून हालचाल दिसू लागली होती. रात्री ३ च्या सुमारास एटीएस आणि मुंबई पोलिस यांच्या संयुक्त पथकाने मुंबईच्या जोगेश्वरी भागातून झाकीर नाव असलेल्या संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान या संदर्भातील टिप दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडूनच आल्याची माहिती मिळत आहे.

Previous articleओ शेठ…’ गाण्यातून वेधले खड्ड्यांकडे लक्ष
Next articleपरमबीर सिंह फरार..? सीआयडीकडून शोध सुरू 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.