Home मुंबई ओ शेठ…’ गाण्यातून वेधले खड्ड्यांकडे लक्ष

ओ शेठ…’ गाण्यातून वेधले खड्ड्यांकडे लक्ष

191

राजेंद्र पाटील राऊत

‘ओ शेठ…’ गाण्यातून वेधले खड्ड्यांकडे लक्ष

ठाणे: (अंकुश नारायण पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज नेटवर्क)

बदलापुरातील उड्डाणपुलाच्या दुरवस्थेबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून उपरोधिक पोस्ट करून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. असे असताना आता राष्ट्रवादीने मोबाइलवर ‘ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट’ हे गाणे वाजवून, तसेच बॅनर झळकवून नगर अभियंत्यांचे खड्डेमय रस्त्याबद्दल उपरोधिकपणे जाहीर अभिनंदन करीत अनोखे आंदोलन केले.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले.

आंदाेलकांना अटक व सुटका
अविनाश देशमुख यांच्यासह आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली. या आंदोलनात विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, डॉक्टर सेलचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अमित गोइलकर, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष संजय कराळे, प्रीतम वानखडे, शंकर चौरे, अरबाज कुरेशी, सिद्धार्थ अंगुरे आदी सहभागी झाले होते.

——————–

Previous articleमराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त कुंटुर येथे राजेश कुंटूरकर सह 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Next articleमहाराष्ट्र एटीएस ची मोठी कारवाई, संशयित दहशतवादी ताब्यात!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.