राजेंद्र पाटील राऊत
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त कुंटुर येथे राजेश कुंटूरकर सह 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कुंटुर:- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर २०२१ रोजी कुंटूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या समाजातील लोक आरोग्याच्या बाबतीत अस्थिर असुन, डेंग्यू, मलेरिया,करोना,या विविध रोगाशी सामना करत असताना आरोग्य यंत्रणेत रक्ताचा मोठ्या तुटवडा जाणवत असल्याने दिनांक १७ सप्टेंबर २०२१ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन शुक्रवारी सकाळी ११:०० वा.पु.साने गुरुजी वाचनालय कुंटुर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मा. राजेश कुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते उमरी पंचायत समिती सभापती मा.शिरिषभाऊ गोरठेकर होते. तर प्रमुख उपस्थिती. माजी सरपंच रुपेश कुंटुरकर,माजी.जि.प.सदस्य सुर्याजी पा.चाडकर, कुंटूर सेवा सहकारी सोसायटी चेअरमन सूर्यकांत पाटील, नायगाव पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी बाबासाहेब पा.हंबर्डे,कुंटूरचे उपसरपंच शिवाजी पा.होळकर, शिवव्याख्याते सोपान पा.कदम,सुधाकर पा.जाधव, कोठाळाचे सरपंच भगवान डांगे, लक्ष्मण पा आडकीने, या मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिर संपन्न झाले. व उद्घाटक राजेश कुंटूरकर, माजी सरपंच रुपेश कुंटूरकर, नायगाव प.स.सदस्य बाबासाहेब पा.हंबर्डे, शिवव्याख्याते सोपान पा.कदम, कोठाळा सरपंच भगवान डांगे, या मान्यवरांनसह 46 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजीक बांधीलकी जपली आणि या शिबिरासाठी आयोजक नांदेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे
जिल्हाउपाध्यक्ष,मारोतराव पा.कदम कुंटूरकर,पंढरी पा.डाकोरे, राजेश आडकीने,विनोद झुंजारे सर, नायगाव राष्ट्रवादी काँग्रेस ता.उपाध्यक्ष बालाजी पा.कदम,बाळु बकवाड, विनोद जाधव, दत्ता शिवणकर, सूर्यकांत बिसमिले, बालाजी आडकीने, यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले आहे.