Home पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक कांग्रेस ची जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक टेंभुर्णी येथील रोटरी क्लब...

राष्ट्रवादी युवक कांग्रेस ची जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक टेंभुर्णी येथील रोटरी क्लब कार्यालय येथे संपन्न

228

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रवादी युवक कांग्रेस ची जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक टेंभुर्णी येथील रोटरी क्लब कार्यालय येथे संपन्न
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहून आपल्या झेडपी गटात व पंचायत समिती गणात नगरपालिका वार्डात बारकाईने लक्ष देऊन प्रारुप मतदार याद्या तपासून काही ठिकाणी चुकीच्या प्रारूप याद्या तयार केल्या असल्या तरी हरकती घेऊन दुरुस्त कराव्यात व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जागा जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत तालुकाध्यक्ष यांनी बुथ कमिट्या नेमावेत गाव तिथे शाखा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले राष्ट्रवादी युवकचे माढा तालुका अध्यक्ष संभाजी पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. व युवक तालुकाध्यक्ष संभाजी पाटील यांचा आदर्श सर्व पदाधिकाऱ्यांनी घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांनी केले.
युवकचे प्रभारी व जिल्हा निरीक्षक माननीय शरदभाऊ लाड यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने एक निष्ठेने पक्षाचे काम करावे. योग्य वेळ आली की पक्ष काम करण्याची संधी देतो त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी गेलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे,प्रदेश सचिव मोहित गायकवाड, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी व सर्व जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस , जिल्हा कार्यकारणी सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुका कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सचिव अतुल खरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक माढा तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ नवले, संजय मिस्कीन, पदवीधर उपाध्यक्ष सज्जन पाटील, ओबीसी उपाध्यक्ष अतुल काशीद, उत्तम महाडिक, अल्पसंख्यांक तालुका समीर मुलानी, टेंभुर्णी शहराध्यक्ष मयूर काळे, रविंद्र बेंद्रे, सर्वेश देवकर, तुषार काशीद, संतोष लोंढे, विकास शीदे, बाबू देशमुख, रोहन साळुंखे, किशोर विश्वकर्मा, अंजान, यांनी सहकार्य केले. व आभार जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील यांनी मानले.

Previous articleगोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा
Next articleई – पिक पाहणी संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.