Home नांदेड गोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

गोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

87
0

राजेंद्र पाटील राऊत

गोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शंकरनगर :- गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर ता.बिलोली जि.नांदेड या नामाकिंत इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे प्राचार्य डी.पी.पांडेय याच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी बोलताना प्राचार्य डी .पी.पांडेय म्हणाले की ; भारतामध्ये 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून भारतामध्ये हिंदी भाषेतलं सौंदर्य, त्यामधील साहित्य जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. भारत हा विविधतेमध्ये एकता जपणारा देश आहे. या देशात जशी संस्कृती बदलते तशी भाषादेखील बदलते मात्र उत्तर भारतासह बहुसंख्य राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. राष्ट्रीय हिंदी दिवसाचं औचित्य साधून देशभरात सरकारी कार्यालयामध्ये खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याद्वारा हिंदी या भारताच्या राजभाषेचा प्रसार केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढील २ वर्षात म्हणजेच १४ सप्टेंबर १९४९ दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदी भाषेचा भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचं औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.यावेळी सौ.रेखा पांडेय , स्वाती दोमाटे , तेजप्रकाश तिवारी,गणेश येरडे, सय्यद एल. बी.,वाघमारे खंडू,जाधव शामसुंदर,सुनील दुबे,यादव झळके,शेरे पुष्पा,देगलूरे जयश्री,सय्यद शबाना,कांचन दुंबे, वाघमारे बालाजी,गायकवाड लक्ष्मण,तसेच शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमचे सुत्रसंचलन श्यामसुंदर जाधव यांनी केले.तर आभार यादव झळके यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here