Home कोल्हापूर हिंदुत्ववादी संघटनांची पोलीस ठाण्यात तक्रार पेठ वडगाव मध्ये चार जणांवर गुन्हा दाखल.

हिंदुत्ववादी संघटनांची पोलीस ठाण्यात तक्रार पेठ वडगाव मध्ये चार जणांवर गुन्हा दाखल.

382

राजेंद्र पाटील राऊत

हिंदुत्ववादी संघटनांची पोलीस ठाण्यात तक्रार पेठ वडगाव मध्ये चार जणांवर गुन्हा दाखल.

पेठवडगाव:(राहूल शिंदे ) येथील बेपारी गल्लीत गोवंश जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी चौघा जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे तर सुमारे तीन लाख रुपये किमतीचे मांस भरलेला टेम्पो जप्त केला आहे. बेपारी गल्लीत गोहत्या केली जात असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी केल्याने ती कारवाई करण्यात आली.
पोलीस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बेपारी गल्लीतील सद्दाम बेपारी, मुन्ना बेपारी, हुसेन बेपारी, शफिक बेपारी यांनी विनापरवाना गोवंश जनावरांची कत्तल करून विक्रीसाठी साठा करून ठेवला होता तसेच काही गोवंश जनावरांना कत्तल करण्यासाठी एका खोलीत डांबून ठेवून क्रुरपणे वागणूक दिली होती त्यानुसार पोलीस अशोक जाधव यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद झाला आहे. काही जनावरांना सोडून देण्यात आलेले आहे. त्यावेळेस हिंदुत्ववादी संघटनांनी भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम बजरंग बली की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
भाजपा, शिवप्रतिष्ठान, बजरंग दल, शिवसेना, युवा सेना या हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात 12 जणांवर कारवाई ची मागणी केली आहे.

Previous articleवानखेड़ विविध कार्यकारी सहकारी संस्था रजिस्टर नंबर 1061 या संस्थेची वार्षीक सर्व साधारण सभा दि 14 संप्टेबर रोजी स्थगीत
Next articleगोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.