राजेंद्र पाटील राऊत
मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) गावास आले तळ्याचे स्वरूप
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथे काल सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने गावास तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून गावालगतची नदी-नाले अतिवृष्टीच्या पावसाने भरभरून ओसंडून वाहत असून
नाल्याकाठच्या जमिनीत
पाणी शिरून शेतातील उभी पिके जमिनीसकट खरडून वाहून गेली आहेत अशा अस्मानी संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यास तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदत करण्याचे आवाहन शेतकऱ्यांतून केले जात आहे. गावास जणूकाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे