Home गुन्हेगारी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात टेम्भुर्णी पोलिसांनी 3 चोरांना 4 तासात...

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात टेम्भुर्णी पोलिसांनी 3 चोरांना 4 तासात केले गजाआड

209

Anshuraj patil

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात टेम्भुर्णी पोलिसांनी 3 चोरांना 4 तासात केले गजाआड युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर,
टेम्भुर्णी- दिनांक 31/8/21 रोजी सकाळी 11:00 वा दरम्यान फायनान्स कर्मचारी फिर्यादी सुरज संजय वाघमारे रा कुर्डुवाडी हे हरिनगर बेंबळे येथील महिला बचत गटाची 28,800/- रोख रक्कम एक सॅमसंग कंपनीचा टॅब व एक बायोमेट्रिक मशीन असे एकूण 39800/- रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली बॅग घेऊन मौजे माळेगाव येथे जात असताना मिटकलवाडी चौकात 3 अनोळखी इसम विना नंबरची सिल्वर रंगाची शाइन मोटरसायकल आले व त्यांनी सूरज वाघमारे यांना काळ्या पाईपाने बेदम मारहाण केली व फिर्यादी जवळ असणारी मुद्देमालाची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन पसार झाले.

संबंधित घटने नंतर सुरज वाघमारे यांनी टेम्भुर्णी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली व सविस्तर घटना सांगितली संबंधित घटनेनुसार टेम्भुर्णी पोलीस ठाणे येथे गु.र.नं-570/2021 भादंवी कलम 394,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हा टेम्भुर्णी पोलीस ठाणे येथे दाखल होताच टेम्भुर्णी पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली टेम्भुर्णी पोलीस ठाणेमधील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पी.व्ही.काशीद सोबत पो.शि बाळराजे घाडगे व पो.शि तुकाराम माने-देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे व कौशल्य पूर्ण तपास करून मौजे माळेगाव ता माढा येथील इसम नागनाथ सुनील कोडक, रा माळेगाव याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने इतर दोन साथीदार यांची नावे सोमनाथ हनुमंत शिंदे , तेजस नागेश पवार दोघे राहणार बेंबळे ता माढा सोबत मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तीनही गुन्हेगारांना सदर गुन्ह्यात तातडीने अटक करण्यात आली.

सदर आरोपी यांची संबंधित पोलीस कर्मचारी यांनी अंगझडती घेतली असता संबंधित मालमत्तेपैकी रोख रक्कम 11200/- रु व तीन मोबाईल असा हस्तगत करण्यात आला.

सदर गुन्ह्याची कार्यवाही अवघ्या 4 तासात मा.तेजस्विनी सातपुते (पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण) मा.अतुल झेंडे (अप्पर पोलीस अधीक्षक) डॉ.विशाल हिरे (उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा) मा.सुरेश निंबाळकर (पोलीस निरीक्षक टेम्भुर्णी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी.व्ही.काशीद पो.शि/1373 बाळराजे घाडगे व पो.शि/711 तुकाराम माने देशमुख तसेच सायबर विभागाचे पो.ना/222 मोरे व पो.शि/1182 जाधव यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काशीद करत आहेत.

Previous articleजितेंद्र शिंदे आहेत तरी कोण? तडकाफडकी बदलीमागे नेमकं कारण काय…? 🛑
Next articleकौळाणेच्या रेशन दुकानात घुसले पाणी पुरवठा विभागाची भोंगळपणाची कहाणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.