Home Breaking News केंद्र शासनाच्या नवीन योजनेतून मुखेड येथे शंभर खाटांच्या रुग्णालयास मंजुरी द्या -आ.डॉ....

केंद्र शासनाच्या नवीन योजनेतून मुखेड येथे शंभर खाटांच्या रुग्णालयास मंजुरी द्या -आ.डॉ. तुषारजी राठोड

147
0

केंद्र शासनाच्या नवीन योजनेतून मुखेड येथे शंभर खाटांच्या रुग्णालयास मंजुरी द्या -आ.डॉ. तुषारजी राठोड
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यात मागील दीड वर्षातील कोरोना स्थिती पाहता केंद्र शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या फिल्ड हॉस्पिटल योजनेत मुखेड नगरपरिषद क्षेत्रात नवीन शंभर खाटांचे रुग्णालय मंजूर करा अशी मागणी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी नुकतीच राज्य शासनाकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास उपजिल्हा रुग्णालयावर वाढत चाललेल्या रुग्णांचा भार कमी होणार आहे.
मुखेड तालुका डोंगराळ भागात वेढलेला असून जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत मुखेड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ व लोकसंख्या ही जास्तीचे आहे. तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी सात प्राथमिक आरोग्य केंद्र,एक ग्रामीण रुग्णालय व मुखेड शहरातील शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. मात्र ही आरोग्य यंत्रणा लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी असल्यामुळे अनेक वेळा या रुग्णालयातील रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण येतो. यातच मागील दीड वर्षापासून देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. याच वेळी इतर तालुक्याच्या तुलनेत मुखेड तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. तालुक्यातील लाखो लोक हाताला काम शोधण्यासाठी मोठ्या शहराकडे जात असतात व साथीचे आजार पसरल्यानंतर ते गावाकडे येतात त्यामुळेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना व इतर आजारांचा संक्रमण झपाट्याने होते. मुखेड तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांना सेवा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पन्नास खाटांचे कोव्हीड हॉस्पिटल कार्यरत आहे. यामुळे इतर आजाराच्या रुग्णांना याच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा मिळविण्यासाठी मोठ्या अडचणीला सामना करावा लागत आहे. यासाठी आ. डॉ. तुषार राठोड यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून रुग्णांना रुग्णसेवा सुरळीत मिळावे यासाठी प्रयत्नही केलेले आहेत. केंद्र शासनाने नुकतीच फिल्ड हॉस्पिटल योजना सुरु केली असून मुखेड तालुक्यातील लोकसंख्या व या भागातील भौगोलिक परिस्थिती पाहता मुखेड शहरात नगर परिषद परिक्षेत्रात नव्याने शंभर खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करावी अशी मागणी आ.डॉ.तुषार राठोड यांनी नुकतीच राज्य शासनाकडे केली आहे. या मागणीकडे राज्य शासनाने गांभीर्याने पाहिल्यास व सदर रुग्णालय मंजूर झाल्यास मुखेड तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिकांना ही चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here