Home माझं गाव माझं गा-हाणं दिंडोरी तालुक्यात खून

दिंडोरी तालुक्यात खून

273

राजेंद्र पाटील राऊत

दिंडोरी तालुक्यात खून

प्रतिनिधी. प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज नेटवर्क

वनी दिनांक 26 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवताळे शिवारात एका तरुणाचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली .घडलेला प्रकार असा की वणी पोलिस ठाण्यात दिनांक 26 जून सकाळी 11 वाजेच्या दरम्यान खबर मिळाली.

अवताळे शिवारात पडक्या घरात मृतदेह आहे अशी माहिती कळताच वनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व चौकशी केली असता हे प्रेत संजय भोये वय 22 यांचे असल्याचे समजले दिनांक 25 जून ला संजय रात्री घरीच आला नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळपासून शोधाशोध सुरू झाली जगदीश चा भाऊ अवताळे शिवारात शोधत असताना एका पडक्या घरात जगदीश मृत अवस्थेत दिसून आल्यावर त्याने घरच्यांना बोलावून सांगितले व वनी पोलिसांना कळविले माहिती मिळताच वनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेहाची तपासणी केली त्याच्या डोक्याला मागच्या बाजूला जखम आढळून आली आहे. त्याच्या डोक्यात दगडाने किंवा हत्याराने अज्ञात आरोपीने जोरदार आघात दिसून आले आहे. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला

वनी पोलिसांनी श्वानपथक व तसे तज्ञांना पाचारण केले आजूबाजूच्या भागाची कसून तपासणी सुरू आहे याबाबत मयत तरुणाची आई मंगल संजय भोये यांनी वणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शर्मिष्ठा घागरे वालावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी कळवण विभाग अमोल गायकवाड हेही वनी येथे दाखल झाले असून घटनास्थळी पाहणी केली

जगदीश भोये याचा खून अज्ञात गुन्हेगारांनी केला असून वनी पोलीस कसून तपास करत आहे हा खून का झाला कोणावर नातेवाइकांकडून संशय व्यक्त केला जातो का याचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे जगदीश संजय भोये यांचा खून झाल्याची फिर्याद मंगल भोये यांनी दिली.

वनी पोलीस ठाण्याचे सपोनि .स्वप्निल राजपूत व त्यांचे अज्ञात गुन्हेगारीचा शोध घेत आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.