Home नांदेड कुंटूर पोलीस ठाण्यात सपोनि निलपत्रेवार रुजु तर सपोनि के एस पठाण यांची...

कुंटूर पोलीस ठाण्यात सपोनि निलपत्रेवार रुजु तर सपोनि के एस पठाण यांची नांदेड येथील मुख्यालयात बदली

295

राजेंद्र पाटील राऊत

कुंटूर पोलीस ठाण्यात सपोनि निलपत्रेवार रुजु तर सपोनि के एस पठाण यांची नांदेड येथील मुख्यालयात बदली

प्रतिनिधी / राजेश भांगे -युवा मराठा न्युज नेटवर्क

नायागाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्यात नुकतेच सहायक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी दिनांक २४ जुन २०२१ रोजी ठाण्याचा पदभार स्वीकारला असून तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक के एस पठाण यांनी कुंटूर ठाण्याचा बावीस महिने चांगल्या प्रकारे पदभार सांभाळला तर त्यांच्या जाग्यावर नूतन सहायक पोलिस निरीक्षक एस डी निलपत्रेवार हे पदभार स्विकार ला आहे

नूतन सहायक पोलीस निरीक्षक निलपत्रेवार यांनी पिंपरी चिंचवड चाकण पोलीस स्टेशन डिटेक्शन येथे दोन वर्षाचा कार्यकाळ गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड २ वर्ष पूर्ण करून पुणे ग्रामीण येथे इंदापुर, दौंड, चाकण पोलीस स्टेशन अशी कार्यकाळात पोलीस खाकी दाखवून खून, जबरी चोरी व मालाविरुधचे गुन्हे उघड करून मुख्य आरोपीस सहायक पोलिस निरीक्षक निलपत्रेवार यांनी अटक केली असल्याचे सांगितले आहे.

तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सपोनि के एस पठाण हे त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघड करून आरोपीला जेलची हवा दाखविली होती त्यांची नांदेडच्या पोलीस मुख्यालयात तोंडी आदेशानुसार बदली झाली असल्यामुळे ते मुख्यालयात रुजू झाले आहेत तर त्यांच्या जाग्यावर पिंपरी चिंचवड येथून आलेले सपोनि संजय डी निलपत्रेवार यांनी कुंटूर ठाण्यात रुजू झाले आहेत.

पोलिस अधिकारी म्हणून चांगल्या प्रकारे सेवा करून तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्यात रुजू झाले आहेत कुंटूर ठाण्याच्या अंतर्गत जर पोलीसाच्या नजरा चुकून अवैध धंदे चालत असतील तर बंद करणार असल्याचे सपोनि निलपत्रेवार यांनी सांगितले असून नुकताच कुंटूर ठाण्याचा पदभार स्वीकारले आहे.

Previous articleलवकरच वाचा! कौळाणेतील शेतजमीन प्रकरण….
Next articleपेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी मोर्चा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.