Home माझं गाव माझं गा-हाणं बागलाण तालुक्यात वंचीत बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

बागलाण तालुक्यात वंचीत बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

231

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा -(शशिकांत पवार युवा मराठा न्युज नेटवर्क)  बागलाण  तालुका बहुजन वंचित आघाडीच्या वतीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या महागाई व चुकीच्या धोरणामुळे सटाणा तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
कोरोना सारख्या महामारी मुळे अनेक लोकांचे रोजगार व नोकऱ्या गेल्या त्याचप्रमाणे लॉक डाऊन, जाचक अटींमुळे विशिष्ट काळ पर्यंतच दुकाने व व्यवसाय सुरू ठेवणे नेमक्याच व्यवसायांना परवानगी देणे, प्रचंड प्रमाणात वाढत असलेली महागाई यांना जनता ग्रासली असून शासनाने दिवसेंदिवस महागाई वाढ केली आहे. महागाईच्या भस्मासुरामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे , अनेक लोकांचे रोजगार व नोकऱ्या गेल्या व सरकार *ऑल इज वेल* भासवत आहे. ज्यांच्या नोकर्‍या गेल्या त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी ,त्यांना पुन्हा नोकरी मध्ये समाविष्ट करावे महागाई कमी करावी. शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना पुन्हा सुरू करून त्यांच्यासाठी असलेला निधी शासनाने कोरोना महामारी साठी वापरल्यामुळे या लोक कल्याणकारी योजना पासून सर्वसामान्य व गरीब जनता वंचित राहिले आहे तरी या सर्व लोककल्याणकारी योजना तात्काळ सुरू करून मुबलक प्रमाणात निधी देऊन लोकांपर्यंत योजना पोहोचाव्यात . शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था सुरळीत करावी गरीब लोकांच्या नावाने सुरु असलेला रेशनचा काळाबाजार तात्काळ बंद करावा, अशा विविध मागण्यांसाठी शासनाला जाग यावी म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने घंटानाद मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी जिल्हा प्रवक्ते अमोल बच्छाव, तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, तालुका महासचिव दादा खरे, तालुका अध्यक्ष चेतन वनिस , जिल्हा सचिव आनंद दाणी, जिल्हा संघटक सुनील जगताप, तालुका प्रसिद्धीप्रमुख कैलास आहिरे ,संघटक निलेश देवरे , किशोर म्हसदे साहेबराव अहिरे आदि तालुका व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते . अनेक जणांनी याप्रसंगी या शासनाच्या ध्येय धोरणांचा निषेध नोंदवला व तसे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Previous articleअँड संतोष धोत्रे यांची युवासेना सहसचिव पदी निवड 🛑
Next articleजास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरबऱ्याच्या हमीभावाचा लाभ घ्यावा- मा. आ. जयवंतराव जगताप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.