Home पश्चिम महाराष्ट्र जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरबऱ्याच्या हमीभावाचा लाभ घ्यावा- मा. आ. जयवंतराव जगताप

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरबऱ्याच्या हमीभावाचा लाभ घ्यावा- मा. आ. जयवंतराव जगताप

117
0

राजेंद्र पाटील राऊत

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरबऱ्याच्या हमीभावाचा लाभ घ्यावा- मा. आ. जयवंतराव जगताप
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
[विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था हमीभाव केंद्राच्या वतीने हरभरा खरेदीचा मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या हस्ते शुभारंभ…. ] शेतकऱ्यांच्या हिताच्या उद्देशाने स्थापन झालेल्या विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या;मांगीअंतर्गत हरभरा हमीभाव केंद्राचे उद्घाटन मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते श करण्यात आले. या अगोदर मागच्या वर्षी संस्थेच्या वतीने तुर व मका हमीभावाने खरेदी करून तालुक्यातील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा फायदा झाला आहे. या हमी केंद्राच्या माध्यमातून ८८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांचा हरभरा हमी भावाने प्रत्यक्ष खरेदी करण्यास आज सुरुवात करण्यात आली. नोंदणी केलेले शेतकरी व इतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन शासनाच्या हमीभावाचा फायदा करून घ्यावा असे आवाहन मा. आ. जयवंतराव जगताप यांनी केले आहे. सध्या बाजारामध्ये हरभऱ्याचे ४२०० ते ४३०० रू. प्रतीक्विंटल असे दर आहेत. परंतु या हमीभाव केंद्रातून रु. ५१०० / – प्रती क्विंटल प्रमाणे हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे असे संस्थेचे संस्थापक सुजिततात्या बागल यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल सर्वसाधारण सहकारीसंस्थेचे संस्थापक सुजित तात्या बागल,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर, माजी सचिव सुनिल शिंदे, नियंत्रक अधिकारी ज्ञानेश्वर घोडके, भारतीय खादय निगम चे देविदास माने, खरेदी -विक्री संघाचे उपाध्यक्ष शहाजी शिंगटे, संचालक जनार्दन नलवडे, व्यापारी विक्रांत मंडलेचा, मनोज पितळे, नवनाथ सोरटे, प्रदिप लुणिया प्रितम लुंकड, आदिनाथ मोरे, रविंद्र उकिरडे, अमोल नलवडे, जाफर घोडके शेतकरी सुभाष जाधव, सुदाम पडवळे आदी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleबागलाण तालुक्यात वंचीत बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन
Next articleपत्रकाराला धमकी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here