Home माझं गाव माझं गा-हाणं खार्डी गावातील रेती प्रकरण तापले..सरपंचाला मारहाण.

खार्डी गावातील रेती प्रकरण तापले..सरपंचाला मारहाण.

282

राजेंद्र पाटील राऊत

खार्डी गावातील रेती प्रकरण तापले..सरपंचाला मारहाण.                                                       पालघर,(वैभव पाटील)
गेल्या कित्येक महिन्या पासून खार्डी गावात रेती उपसा केला जात आहे.उपसा केलेली रेती साठवून ठेवली जात आहे. तलाठी खार्डी यांना या बाबत सरपंच राजेश घरत यांच्या कडून वारंवार माहिती दिल्या नंतरही कारवाही झाली नाही. याचा फायदा घेत साठवून ठेवलेल्या रेतीचा पंचनामा करण्या करिता आलेल्या तलाठी ढगे समोर सरपंचाला महेंद्र घरत याने मारहाण करून पंचनामा करण्या पासून रोखले आहे.सरपंच राजेश घरत यांना डोक्यावर हातावर लोखंडी सळीने मारल्या मुळे जबर मार बसला आहे. तलाठी ढगे यांनी अवैध रेतीचा पंचनामा न करता पळ काढला आहे. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आपलं कर्तव्य बजावण ही त्यांची नैतीक जवाबदारी होती.ती सोडून पळ काढल्या मुळे रेती माफियाची हिम्मत वाढली आहे. शासनाला न जुमानता हे रेती माफिया तलाठी शासकीय अधिकाऱ्यां समोर गंभीर गुन्हा करतात तरी प्रशाशन गप्प का असा खडा सवाल ग्रामस्थ करीत आहे.