Home नांदेड नायगाव येथे एका १७ वर्षीय मुलीची ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्याने गळफास घेऊन...

नायगाव येथे एका १७ वर्षीय मुलीची ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या प्रतिनिधी / राजेशNभांगे

703
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव येथे एका १७ वर्षीय मुलीची ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी / राजेश भांगे

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना.
नांदेड करोना संकटाच्या काळात शिक्षण पूर्णपणे ऑनलाइन झाल्याने त्यातून अनेक गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल वा लॅपटॉप आवश्यक असल्याने गरीब कुटुंबातील मुलांची मोठी कोंडी झाली आहे. यातूनच नांदेडात एका १७ वर्षीय मुलीचा बळी गेला आहे.
ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्याने या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून जिल्ह्यातील नायगाव शहरात खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील मजूर असलेल्या प्रकाश पोटफोडे यांची हलाकीची स्थिती असल्याने ते त्यांच्या मुलीला मोबाइल घेऊन देऊ शकले नाहीत. त्यातून अकरावीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले. नायगाव शहरातील फुलेनगर वसाहतीत राहणाऱ्या बुद्धीशी पोटफोडे हिने नैराश्येतून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुद्धीशी सध्या अकरावी इयत्तेत शिकत होती. तिला दहावीला ७५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवण्यासाठी ती जिद्दीने अभ्यास करत होती.
मात्र मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळा येत होता. याबाबत तिने आपल्या आई-वडिलांना सांगितले व मोबाइलची मागणी केली होती. तर घरची स्थिती बेताची असल्याने लगेचच मोबाइल घेता आला नाही घरच्यांनी तिला लवकरच मोबाइल घेऊ असे आश्वस्त केले होते. मात्र पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने मोबाइल घेणं लांबणीवर पडत होतं.
यातून नैराश्य आल्याने बुद्धीशीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. आज एका मोबाइलसाठी गुणवान मुलीचा बळी गेल्याने सगळेच हादरले आहेत.

Previous articleखार्डी गावातील रेती प्रकरण तापले..सरपंचाला मारहाण.
Next articleमेडशी येथे लसीकरण मोहिमेस मेडशी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here