किनवट येथे सहाय्यक कृषी अधिकारी परिवार महाराष्ट्र, कृषी सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन बीज प्रक्रिया स्पर्धेचे आयोजन.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
किनवट जि. नांदेड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय किनवट, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मोहीम स्वरूपात राबविण्यात येणारी बीज प्रक्रिया मोहीम, बीज उगवण क्षमता चाचणी मोहीम, दहा टक्के बचत, बी. बी. एफ. सोयाबीन पेरणी इत्यादी विषयावर सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी परिवार महाराष्ट्र आणि कृषी सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन बीजप्रक्रिया स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ऑनलाइन बीज प्रक्रिया स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना आरसीएफ बायोला जैविक संघ देऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. खरीप पूर्व पेरणी नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री बी.बी. मुंडे सर, आत्मातंत्र व्यवस्थापक श्री शिवप्रकाश पटवे सर, कृषी पर्यवेक्षक श्री गजानन भालेवाड, कृषी सहाय्यक श्री एस.एस. दांडेगावकर, श्री एस.डी.
निळकंठवार, आर सी एफ चे समन्वयक श्री राहुल पवार सर, सदन शेतकरी मुकुंद शिट्टीवार, नरसिंग पिसारीवार, सागर पिसारीवार, श्रीनिवास नेमानीवार, किशन जलगमवार सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




