Home मराठवाडा शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित 🛑

शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित 🛑

266

राजेंद्र पाटील राऊत

🛑 शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित 🛑
✍️ जालना 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जालना :⭕शहरातील शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष, रानटी मारहाणीचा व्हीडिओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांनी निलंबित करण्यात आले आहे. जालना पोलीस अधिक्षक यांनी ही कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण..?
शिवराज नारियलवाले हे 9 एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याचसुमारास गवळी समाजाचा एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक तेथे धुडघूस घालत होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलीस हे अतिशय अर्वाच्य शब्दात शिविगाळ करीत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिविगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली.

व्हीडिओ काढल्याच्या रागातून पण, त्यांना त्याची जी जबर शिक्षा उपस्थित पोलिसांनी दिली, ते या व्हीडिओतून दिसून येते. गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेले 2 असे आठ पोलिस त्यांना घेरून अमानूष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली. असे व्हायरल व्हीडिओत स्पष्ट दिसत आहे.

याप्रकरणी आता जालना पोलीस अधिक्षक यांनी संबधितांवर निलंबनाची कारवाई केली आहे.⭕

Previous article🛑 केवळ सलमानसोबत चांगलं नातं निर्माण करण्यासाठी ‘राधे’ केला”, प्रविण तरडेंनी केला खुलासा 🛑
Next articleवाखरी येथे भारतीय मानवाधिकार परिषद तर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.