Home मुंबई 🛑 केवळ सलमानसोबत चांगलं नातं निर्माण करण्यासाठी ‘राधे’ केला”, प्रविण तरडेंनी केला...

🛑 केवळ सलमानसोबत चांगलं नातं निर्माण करण्यासाठी ‘राधे’ केला”, प्रविण तरडेंनी केला खुलासा 🛑

107
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 केवळ सलमानसोबत चांगलं नातं निर्माण करण्यासाठी ‘राधे’ केला”, प्रविण तरडेंनी केला खुलासा 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕मराठी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रवीण तरडेंनी स्वत:ची खास ओळख निर्माण केलीय.

प्रविण तरडेंच्या सिनेमांना प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळते. नुकत्याच रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘राधे- युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ या सिनेमात प्रविण तरडेंनी दगडू दादा ही एका गुंडाची भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका अत्यंत छोटी होती.

राधे सिनेमातील प्रविण तरडेंच्या भूमिकेमुळे चाहते नाराज झाल्याचा खुलासा स्वत: प्रविण तरडेंनी केलाय.

प्रविण यांनी या मुद्द्यावर भाष्य़ केलंय. सुपरस्टार सलमान खानसोबत नातं निर्माण करण्याची ही छोटी भूमिका स्विकारल्याचा खुलासा त्यांनी केलाय. व्यावसायिक चित्रपट आवडत नसल्याचं सांगत असतानाच प्रविण तरडे म्हणाले, “हिंदी सिनेमाच्या तुलनेत मराठी चित्रपट आशयांच्या बाबतीत अधिक चांगले आहेत.”

प्रविण तरडे यांच्या सिनेमातील भूमिकेमुळे चाहते नाराज झाल्याचं ते म्हणाले. एवढी लहान भूमिका त्यांनी का स्विकारली असा प्रश्न चाहते विचारत असल्याचं तरडे म्हणाले. ” भूमिका किती मोठी आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही.

मला सलमान भाईसोबत नात निर्माण करायचं होतं आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.” असं ते म्हणाले. ⭕

Previous articleपुणे शहरात आजपासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार..! 🛑
Next articleशिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here