Home पश्चिम महाराष्ट्र नदीकाठच्या भागात बोटी ठेवा : आ. देशमुख           ...

नदीकाठच्या भागात बोटी ठेवा : आ. देशमुख             

187

राजेंद्र पाटील राऊत

नदीकाठच्या भागात बोटी ठेवा : आ. देशमुख                                                                 युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

लवंगीत मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

सोलापूर
– दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा शनिवारी नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी आ. सुभाष देशमुख यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आ. देशमुख यांनी तहसीलदार आणि संबंधित अधिकार्‍यांना सूचना देत पिडीत कुटुंबाला सवातोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
शनिवारी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या समीक्षा शिवाजी तानवडे, अर्पिता शिवाजी तानवडे, आरती शिवानंद पारशेट्टी, विठ्ठल शिवानंद पारशेट्टी या मुलांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी त्यांचा शोध घेण्याचे काम नदी परिसरात सुरू होते. अखेर दुपारी सर्वांचे मृतदेह सापडले. आ. सुभाष देशमुख यांनी सकाळच्या सुमारास घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन करत धीर देण्याचा प्रयत्न केला. प्रशासानाकडून कुटुंबाला सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल याची गाव्ही नातलगांना दिली. यावेळी तहसीलदार उज्वला सोरटे, पो.नि. नितीन थेटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. देशमुख यांनी मदत व पुनवर्सन विभागाचे सचिव सचिन गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा करत नदी काठाच्या भागात बोटी ठेवण्याचे सूचना दिले. पावसाळ्यात या नदीला भरपूर पाणी येते. त्यामुळे आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे. सध्या तेथे असलेल्या बोटी नादुरूस्त आहेत, नवीन बोटी नदी काठी ठेवावेत, असे सूचना आ. देशमुख यांनी दिले.

Previous articleइंदिरा गांधी सामान्य रुग्णालया त अनेक व्हेंटीलेटर वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस                   
Next articleपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर”                   
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.