Home पश्चिम महाराष्ट्र नेर्लेत संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी १० बेड चे वाटप

नेर्लेत संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी १० बेड चे वाटप

251

राजेंद्र पाटील राऊत

नेर्लेत संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी १० बेड चे वाटप

नेर्ले : नेर्ले ता.वाळवा गावामध्ये कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जलसंपदा मंत्री मा. जयंतरावजी पाटील व युवा नेते प्रतीक पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नेर्ले ता. वाळवा जि. सांगली येथील कोरोना संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी १० बेड देण्यात आले या बेडमुळे संस्थात्मक विलगीकरण कक्षातील एकूण बेडची संख्या १५ झाली असून गावातील कोरोणा संक्रमित रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. यांचे वितरण माजी सरपंच संभाजी पाटील, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य शुभम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच छायाताई रोकडे, ग्रा.पं. सदस्य निवास माने, अर्चना पाटील, शोभा पाटील, मनिषा जंगम, अनिल साळुंखे, युवा नेते सुयोग पाटील, नेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे, डॉ. वायदंडे, कृष्णाजी माने, विवेक शहा, प्रवीण पाटील, बाळासाहेब रोकडे, गणपती पाटील, सुभाष पाटील, भास्कर चव्हाण, कमलाकर वडार, धनंजय बामणे, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleचावरे गावात १४ जन कोरोना पाँझिटीव्ह
Next articleनायगाव येथे बच्चेवार यांचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांच्या संपर्क कार्यालयात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.