Home नांदेड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पहील्याच सभेत शेतकरी हीताचे निर्णय.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पहील्याच सभेत शेतकरी हीताचे निर्णय.

306

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पहील्याच सभेत शेतकरी हीताचे निर्णय.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नां.जि.म.स,बॅंकेच्या नवनिर्वाचीत संचालक मंडळाची पहीली बैठक संपन्न झाली.या बैठकीत शेतकर्‍यांच्या हीताचे निर्णय घेवून शेतकर्‍यांना दीलासा देण्यात आला.
या बैठकीत संचालक मा.हणमंतराव पाटील बेटमोगरेकरांनी पुढील ठराव मांडले त्यास संचालक मंडळाची मान्यता मीळली.
१,पिककर्जात गेल्यावर्षीपेक्षा २० % वाढ देण्यात येणार आहे त्यासाठी नवा बाॅंड लागणार होता. नव्या बाॅडची गरज नसुन मागच्या वर्षीच्याच बाॅंडवर वाढीव पिककर्ज वाटप करण्यात येईल.
२,प्रत्येक शेतकर्‍यांकडून शासकीय अनूदान वा सहायता निधीतून १००० रू.कपात करण्यात येत होती त्यास शेतकरी विरोध करीत होते ती कपात होवू नये अशी शेतकर्‍यांची मागणी होती ती मान्य करण्यात आली असून आता कसलीच कपात होणार नाही.
समाज माध्यमांवर वरील दोन्ही मागण्यां विषयी शेतकरी बांधवा कडून मागणी होत होती एक तर बाॅंड ऊपलब्धता नव्हती व शेतकरी अडचणीत होता.दुसरी मागणी एक हजार कपातीची ही रद्द करण्याची होत होती आधीच वेगवेगळ्या संकटात शेतकरी भांबावून गेला होता खताची भाववाढ असो वा लाॅकडावून अशा असाधारण परीस्थीतीत अजून ही हजाराची कपात शेतकर्‍यांच्या माथी मारली जात होती. जनतेच्या या मागण्या आंम्ही मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकरांच्या निदर्शनास आणुन दील्या होत्या. त्यांनी तातडीने लक्ष देवून बॅंकेच्या पहील्याच संचालक मंडळात वरील दोन्ही मागण्या मान्य करुन घेतल्या.
अशा आदेशाचे परीपत्रक सर्व शाखाना पाठविण्यात येईल .
.याबद्दल शेतकरी बांधवात समाधान व्यक्त होत आहे.विवीध स्तरातुन बॅंकेचे अध्यक्ष मा.वसंतराव चव्हाण साहेब व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मा.हणमंतराव पाटील बेटमोगरेकरांनी पहील्या बैठकीत हा विषय मांडला व मान्यता मीळविली त्याबद्दल शेतकरी बांधवानी कृतज्ञता व्यक्त केली.
पालक मंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण साहेबांनी दीलेल्या दीशा निर्देशा प्रमाणेच नवे संचालक मंडळ शेतकर्‍यांच्या हीताचे निर्णय भवीष्यातही राबवेल असा विश्वास संचालक मंडळानी व्यक्त केला.

Previous articleशेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासून बियाणांचा वापर करावे -कृषी सहायक श्री जोशी सर
Next articleएप्रिल आणि मे महिन्यात देशात १ लाख ३८ हजार कोरोना मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.