राजेंद्र पाटील राऊत
🛑 शौर्य फाउंडेशनच्या वतीने अंबरनाथ फणशीपाडा मध्ये कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 🛑
✍️ अंबरनाथ 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
ठाणे /अंबरनाथ:-⭕दिनांक २३ मे २०२१ रोजी शौर्य फाऊंडेशनच्या वतीने अंबरनाथ येथील फणशीपाडा या आदिवासी भागात येथे तौत्के वादळामुळे अतोनात नुकसान झालेल्या कुटुंबाना आधार देण्यासाठी कपडे वाटप करण्यात आले.
तसेच १०० पॅकेट्स मॅग्गी व १५० पॅकेट्स बिस्कीट देखील वाटप करण्यात आले.
आधीच कोरोनामुळे सर्व सामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होत असतानाच वादळामुळे घरावरील छप्पर उडून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असता शौर्य फाऊंडेशनच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. ⭕