Home Breaking News विजेचा शॉक लागून वाटेगावातील पैलवानाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून वाटेगावातील पैलवानाचा मृत्यू

276

विजेचा शॉक लागून वाटेगावातील पैलवानाचा मृत्यू

 

कोल्हापूर : वाटेगाव ता. वाळवा येथील सुकुमार संभाजी जाधव (वय २२) या नामांकित पैलवानाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने वाटेगाव परिसरात व कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दि. २० मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लटके मळा येथे सुकुमार शेतात गेला होता. शेतात पोल्ट्री शेडचे काम सुरू होते. त्यासाठी लागणारा लोखंडी अँगल उभा करताना अँगलचा धक्का बाजूनेच गेलेल्या ११ केवी च्या विजेच्या तारेला लागला. अन सुकुमारला जोराचा शॉक बसल्याने तो जमिनीवर कोसळला. परिसरातील नागरिकांनी सुकुमारला ताबडतोब कराड येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची तपासणी करून वैद्यकीय सूत्रांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.

Previous article१८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्र चालू करण्याची इचलकरंजीच्या नागरिकांची मागणी.
Next articleसटाणा शहरात अवतरला कोरोना रुग्णासाठी देवदूत योध्दा “पठाण सर”       
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.