Home माझं गाव माझं गा-हाणं पिंगळवाडेत आरोग्य उपकेंद्राच्या छताचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान

पिंगळवाडेत आरोग्य उपकेंद्राच्या छताचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान

258

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा -( शशिकांत पवार, युवा मराठा न्यूज नेटवर्क, सटाणा)- बागलाण तालुक्यात सलग तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले असून नागरिक हैराण झाले आहेत तर ठीक ठिकाणी लाखो च नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी काहीही व्यवस्था नव्हती त्यांनी प्लास्टिक कागदाने शेतातच कांदे व मका झाकून ठेवले होते पण सोसाट्याच्या वादळामुळे प्लास्टिक कागद उडून गेल्यामुळे शेतातील कांदे व इतर पिकांचे भिजल्या ने लाखोंचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी कांदा चाळी वरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. तालुक्यातील पिंगळ वाडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या छतावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. ऐन कोरोनाच्या काळात आरोग्य उपकेंद्राचे झालेले नुकसान हा एक नागरिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.

Previous articleखरीप हंगाम सुरू होण्याच्या शुभमुहूर्तावर रासायनिक खताच्या दरवाढ केल्याने शेतकऱ्यात तीव्र असंतोष.
Next articleऑल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या जिल्हासहसचिव पदी जावेद अहेमद यांची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.