Home नांदेड छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त राजमुद्रा ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर..

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त राजमुद्रा ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर..

416

राजेंद्र पाटील राऊत

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त राजमुद्रा ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

स्वराज्याचे धाकले धनी छात्रविर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राजमुद्रा ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.
तरी दि.१४ मे रोजी सकाळी ठीक १० वाजता भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण छत्रपती राजे संभाजी महाराज चौक येथे करण्यात येणार आहे नंतर लगेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे मग लगेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराला सुरुवात होईल.
जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून सर्वच ठिकाणी रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत असल्या कारणाने राजमुद्रा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती निमित्त यंदा भव्य अश्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी राजमुद्रा ग्रुप ने मोठ्या उत्साहात धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केल्या जाते पण गेल्या वर्षी आणि यावर्षी राजमुद्रा ग्रुप ने कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून साजरी करण्यात येत आहे..
तरी सर्व शिवशंभू प्रेमी व सर्व बहुजन बांधवानी व राजमुद्रा ग्रुप च्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून रक्तदान करून सहकार्य करावे असे आव्हान राजमुद्रा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले यांनी केले..

Previous articleकोविशिल्ड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण
Next articleआखाजीचा सण लुप्त होत चालला; यापुढे फक्त परंपरा म्हणूनच साजरा होणार अक्षयतृतीयाचा सण!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.