राजेंद्र पाटील राऊत
कोविशिल्ड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण
(युवराज देवरे प्रतिनिधी
दहीवड)
आज दि 13/05/2021 रोजी दहिवड ता देवळा जि नाशिक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड यांचे वतीने कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड 19 लसीचा दुसरा डोस (इंजेक्शन)
दहिवड तसेच परीसरातील गावातील नागरिकांना देण्यात आला.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मा वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र दहिवड डॉ सचिन वैद्य यांनी सुसुत्रता हाताळली.
सदर प्रसंगी प्रयोगशाळा तज्ञ भामरे अप्पा, राहुल दादा यांनी प्रत्येक लस धारकांची रॅपिड टेस्ट करून लस घेण्यासाठी सक्षम असल्याचे रिपोर्ट सादर केले.
सदर वेळी आरोग्य सहाय्यक पाटील सिस्टर, बोरसे सिस्टर, नवले भाऊसाहेब, आढाव तात्या, युवराज दादा, , KLD शिक्षक राऊत सर, आशा वर्कर वंदना महिरे, मैना शेळके, होमगार्ड कर्मचारी आदिंनी लसीकरण मोहीम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.नागरिकांनी उत्तम रित्या प्रतिसाद दिला.
सरपंच आदिनाथ ठाकूर, श्री संजय दहिवडकर तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना देवळा यांनी समस्त गावकऱ्यांची आभार मानले.