राजेंद्र पाटील राऊत
🛑 नालासोपारा पूर्वेकडील गालानगर मार्केट मध्ये ग्राहकांची होते प्रचंड गर्दी 🛑
✍️ नालासोपारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
नालासोपारा:-⭕कोरोना रोगाने संपूर्ण देशाला ग्रासले असताना राज्य सरकारने महाराष्ट्र मध्ये लॉकडाऊन ची घोषणा केली. 22 एप्रिल पासून 1 मे पर्यत कडक लॉकडाऊन जाहीर केले. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ अशी वेळ दिली आहे.परंतु काही नागरिक बेजबाबदार पणे वागत आहेत.
रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण नाही असे वाटत आहे.नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर मार्केटमध्ये ग्राहक भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत.नियमांचे पालन न करता ग्राहक दुकाना समोर गर्दी करत आहेत.
बेजबाबदार पणे असेच वागत राहील्यास कोरोना रोगाचा प्रसार वाढत जाईल आणि अधिक धोका निर्माण होईल.⭕