Home माझं गाव माझं गा-हाणं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामेश्वर कृषी उत्पन्न मार्केट ची नवीन निर्मिती करण्यात आली .

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामेश्वर कृषी उत्पन्न मार्केट ची नवीन निर्मिती करण्यात आली .

125
0

राजेंद्र पाटील राऊत

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामेश्वर कृषी उत्पन्न मार्केट ची नवीन निर्मिती करण्यात आली .
प्रतिनिधी= प्रवीण अहिरराव /युवा मराठा न्युज नेटवर्क

उमराणे=देवळा तालुक्यातील उमराणा देवळा रस्त्यालगत असलेल्या खारीपाडा येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक=13/4/2021 रोजी सुरू करण्यात आलेल्या रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाऊसाहेब पांडुरंग सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी लिलावासाठी आणलेल्या मुहूर्ताच्या बैलगाडी तील गावठी कांद्यास गजानन आडतचे संचालक संजय देवरे यांनी सर्वोच्च दराने बोली लावत 2121 रुपये दराने कांदा माल खरेदी केला.
तत्पूर्वी व्यापारी असोशियन चे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी बाजारात उमराणे गावापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा फुले नगर खारीपाडा येथे खाजगी मार्केट साठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुंडलिक देवरे व श्रीपाल ओस्तवाल यांनी शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशस्त जागेत रामेश्वर कृषि उत्पन्ना मार्केट ची निर्मिती केली . तसेच उमराणे ,चांदवड ,लासलगाव, पिंपळगाव ,देवळा, कळवण, येथील व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleआपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच, निष्क्रिय समित्या मुळे खेडेगावात कोरोनाचा शिरकाव
Next articleलाँकडाऊनच्या नावाखाली सर्रास व्यापाऱ्याचा काळाबाजार सुरु…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here