Home मराठवाडा उस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले 🛑

उस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले 🛑

178

राजेंद्र पाटील राऊत

🛑 उस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले 🛑
✍️उस्मानाबाद 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

उस्मानाबाद :⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक दि चेन मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मागील आठ दिवसांपासून प्रशासनाने सलून बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. पण दुकान बंद झाल्याने उदरनिर्वाहाचे बिकट संकट निर्माण झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील एका सलुन व्यावसायिकाने आपले जीवन संपवले आहे. मृत्युपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून दुकान बंद झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

मागील आठ दिवसापासून व्यवसाय बंद असल्याने उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने सांजा येथील तरुण व्यवसायिक मनोज झेंडे (वय ४०) यांनी शनिवारी रात्री विषारी औषध पिले. कुटुंबीयांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोप झेंडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज झेंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी लिहीले आहे की, माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे. मी कोरोनाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. आमची दुकाने बंद आहेत, आम्ही पाच हजार रुपयांवर घर कसे चालवायचे असे देखील मनोज झेंडे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. ⭕

Previous articleदुःखद निधन  भावपूर्ण श्रद्धांजली
Next articleनेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस थांब्यासाठी संगमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात १ मे ला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.