Home माझं गाव माझं गा-हाणं मनसे पदाधिकाऱ्याने कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या 🛑

मनसे पदाधिकाऱ्याने कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या 🛑

191

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मनसे पदाधिकाऱ्याने कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या 🛑
✍️ नाशिक 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नाशिक :-⭕जिल्ह्यातील सटाणा साक्री रोडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारमध्येच त्यांनी डोक्यात गोळी झाडून जीवनयांत्रा संपवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा साक्री रोडवर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नंदू ऊर्फ नंदलाल गणपत शिंदे (वय 55) असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. नंदू शिंदे हे मनसेचे पदाधिकारी होते. तसंच ते महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी देखील होते.

घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारच्या समोर सीटवरच नंदू शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून  आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे.

नंदू शिंदे हे उद्योजक होते, त्यांनी अचानक उचलेल्या टोकाला पावलामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.⭕

Previous articleनांदेड येथे आठवड्याभरात कार्यरत होणार जंबो कोविड सेंटर
Next articleवारजे परिसरामध्ये नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नाने बारटक्के दवाखान्या मध्ये कोरोना लसीकरण केंद्र 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.