Home मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकीय निष्ठा तपासणार; गृहमंत्री वळसे-पाटील ‘इन ऍक्शन’ 🛑

पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकीय निष्ठा तपासणार; गृहमंत्री वळसे-पाटील ‘इन ऍक्शन’ 🛑

209

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकीय निष्ठा तपासणार; गृहमंत्री वळसे-पाटील ‘इन ऍक्शन’ 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई –⭕ राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी आज राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. सुत्रे हाती घेताच प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन अशी ग्वाही वळसे-पाटील यांनी दिले. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

वळसे पाटील यांनी राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या प्रश्नावरही सूचक विधान केलं आहे.

“कुणाची निष्ठा काय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं दिलीप-वळसे पाटील म्हणाले . पोलीस दलामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असून ते निष्ठा बाळगून काम करत असल्याबाबत पाटील यांना विचारण्यात आलं होतं.

आधीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परवीर सिंह यांनीच आरोप केले होते. त्या आरोपांच्या चौकशीमुळं देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. परवीर सिंह यांचे भाजपशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता.

त्यामुळे वळसे पाटील यांचे राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.⭕

Previous articleपोलीसदादा आले आणि गाव बंद करून गेले..काही क्षणात तालुका लॅाक..! व्यापाऱ्यांकडून विरोध, सरकारचा निषेध..🛑
Next articleवृत्तपत्र विक्रेत्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून घेतली कोविड-१९ लस 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.