राजेंद्र पाटील राऊत
कोरोना covid-19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तुपदाळ करांनी त्रिसुत्री नियमांचे पालन करावे. असे आवाहन – संदीप चंद्रकांतराव घाटे सरपंच प्रतिनिधी तुपदाळ
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून तुपदाळ ग्रामवासीयांनी मास्क चा वापर करावा, गर्दी मध्ये एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवावे, 45 वर्ष वय असलेल्या सर्वच नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन सरपंच.प्र.संदीप चंद्रकांतराव घाटे यांनी केले.
कोव्हीड आजारामुळे आपल्या नजरेसमोर आपले जवळचे मित्र,नातेवाईक दररोज मुर्त्यूमुखी पडत आहेत. कोव्हीड आजारावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा,अतिमहत्वाचे काम असेल तरच प्रवास करावा.गर्दी मध्ये एकमेकापासून सुरक्षित अंतर ठेवावे,प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व मनात भीती न ठेवता 45 वर्षावरील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी.
सध्या कोव्हीड लस विषयी नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत परंतु कोव्हीड लस हि अत्यंत सुरक्षित असून थोडा ताप येणे या शिवाय दुसरा कुठला हि दुष्परिणाम नाही. लक्षणे दिसताचक्षणी उपचार करून घ्यावा. वारंवार हाथ धुणे,सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर थुकने टाळावे,व मास्क स्यानिटायजर चा वापर करावे.
असे आव्हान तुपदाळ चे सरपंच.प्र.संदीप चंद्रकांतराव घाटे यांनी केले आहे




