राजेंद्र पाटील राऊत
निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याचे मानधन महिन्याला द्या – प्रहार
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील दिव्यांग, आपंग,विधवा,श्रावणबाळ,संजय गांधी निराधार योजनेतील मानधन निराधारांंना महिन्याचे महिन्याला देण्याची मागणी प्रहारणे केली आहे.
मागणी काही महिन्यापासून निराधारांना शासनाकडून मिळणारे मानधन वेळेवर मिळत नसल्याने तालुक्यातील निराधारावर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यातील निराधारांना महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या आत महिनेवारी मानधन देऊन निराधाराची उपासमारी थांबवावी. अशी मागणी आज मुखेडचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्ष्यांच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे मुखेड तालुका अध्यक्ष शंकरभाऊ वडेवार,प्रहारचे मुखेड शहर प्रमुख साईनाथ बोईनवाड,प्रहार दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष संजय कांबळे,राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष सचिन पा.इंगोले,युवा नेतृत्व रणजित जामखेडकर,
प्रहारचे उप शहराध्यक्ष मुकेश भालेराव ,प्रहार दिव्यांग आघाडीचे शहर उपाध्यक्ष शंकर डोंगरे,प्रहार सहसचिव परवेझ कंधारी,उज्वला लक्ष्मणराव गरूडकर,राम चिंतलवाड,शेख महेबुब तुरासाब यांच्या सह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
