Home माझं गाव माझं गा-हाणं शौर्य फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेमार्फत टिटवाळा मधील आदिवासी भागात सॅनिटरी नॅपकिन्स आणि...

शौर्य फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेमार्फत टिटवाळा मधील आदिवासी भागात सॅनिटरी नॅपकिन्स आणि मास्कचे वाटप करण्यात आले 🛑

209

राजेंद्र पाटील राऊत

🛑 शौर्य फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेमार्फत टिटवाळा मधील आदिवासी भागात सॅनिटरी नॅपकिन्स आणि मास्कचे वाटप करण्यात आले 🛑
✍️ कल्याण 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कल्याण:-⭕स्त्रियांची दोन रुपे समाजात सतत वावरत असतात.
एक शौर्यमय दुर्गेचे आणि दुसरे सोशीक मातेचे. स्त्रीचे पांग फेडण्याचा एक तिच्या हक्काचा दिवस म्हणजेच महिला दिन.

या वर्षीच्या महिला दिनानिमित्त शौर्य फाउंडेशन या समाजसेवी संस्थेमार्फत टिटवाळानजीक वसलेल्या कोनावाडी आदिवासी भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स तसेच डेटॉल साबण व मास्कचे मोफत वितरण करण्यात आले.यासोबतच शौर्य फाऊंडेशनच्या वतीने ठाणे शहर पोलीस उप-आयुक्तालय, वाहतूक शाखा येथे ज्यांच्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था टिकून राहते त्या पोलीस भगिनींकरीता सॅनिटरी नॅपकिन्सचे बॉक्स भेट म्हणून देण्यात आले.यावेळी माझा होशील ना फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे यांची देखील उपस्थिती लाभली तसेच उपस्थित सर्वांनीच शौर्य फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमात प्रामुख्याने फाऊंडेशनचे सोहम चव्हाण, जयेश ढोकणे, सागर चव्हाण, सिद्धी चासकर, दुर्गेश माशेरे, कोमल राऊत, मंदार कांबळे, ज्योती चोरगे, स्नेहल सुतार, आदित्य गायकवाड यांचा सहभाग राहिला. ⭕

Previous articleऔरंगाबाद कडकडीत बंद व्यापारी आणि औरंगाबादकरांचा चांगला  प्रतिसाद
Next articleशिव प्रासादिक क्रिडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आवाशी संघ विजेता तर उपविजेता संघ मुसाड चांदेवाडी 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.