• Home
  • औरंगाबाद कडकडीत बंद व्यापारी आणि औरंगाबादकरांचा चांगला  प्रतिसाद

औरंगाबाद कडकडीत बंद व्यापारी आणि औरंगाबादकरांचा चांगला  प्रतिसाद

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1615633875388.jpg

औरंगाबाद कडकडीत बंद

  • व्यापारी आणि औरंगाबादकरांचा चांगला  प्रतिसाद

औरंगाबाद : (युवा मराठा न्युज नेटवर्क)- गेल्या काही दिवसात शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हजाराकडे वाटचाल करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरात ११ मार्च ते ४ एप्रिल असा २५ दिवसाचा अंशत: लॉकडाऊन घोषित केला. त्यात शनिवार रविवार कडक लॉकडाऊन असेल आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.

याला शनिवार (दि. १३) रोजी शहरातील व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. यात टी. व्ही. सेंटर चौक, कॅनॉट परिसर, बजरंग चौक, चिस्तीया चौक, मुकुंदवाडी परिसर, आकाशवाणी चौक, औरंगपुरा, निरला बाजार, पैठण गेट, गजानन महाराज मंदिर परिसर ठिक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला.

चौका- चौकात पोलिसांचे तपासणी पथक आणि बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी सकाळपासून शुकशुकाट असून केवळ मोजकेच जीवनावश्यक दुकाने चालू असल्याचे चित्र होते.

anews Banner

Leave A Comment