Home मराठवाडा मोठी बातमी..! औरंगाबाद शहरात शनिवार, रविवार लॉकडाऊन 🛑

मोठी बातमी..! औरंगाबाद शहरात शनिवार, रविवार लॉकडाऊन 🛑

194

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मोठी बातमी..! औरंगाबाद शहरात शनिवार, रविवार लॉकडाऊन 🛑
✍️ औरंगाबाद 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद :⭕ औरंगाबादकरांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. शहरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन असेल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे औरंगाबादच्या लॉकडाऊनबाबत आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या १५ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येत्या ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत राहिल.

*कसे असेल लॉकडाऊन?*

या लॉकडाऊनसाठी लवकरच नवी नियमावली जारी केली जाणार आहे. यानुसार राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांचे आयोजन करता येणार नाही.

रात्री ९ पर्यंत हॉटेल सुरू राहणार आहे. मात्र त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. पण रात्री ११ पर्यंत होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयही अर्ध्या क्षमतेने सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार, रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. मात्र यानंतर जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर मात्र औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे.⭕

Previous articleइंधन दरवाढीमुळे लातूरच्या युवकाने उचलले ‘हे’ पाऊल 🛑
Next articleछावा छात्रवीर सेनेच्या वतीने संभाजी ब्रिगेड चे लोकसभा उपाध्यक्ष श्री दिलीप पाटील सुगावे गोजेगावकर यांचा सत्कार सोहळा संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.