Home नांदेड नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथे अंगणवाडी खाऊचे रिकामी पाकीट सापडल्याने बालविकास अधिकाऱ्यांनी...

नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथे अंगणवाडी खाऊचे रिकामी पाकीट सापडल्याने बालविकास अधिकाऱ्यांनी केला पंचनामा     

283

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथे अंगणवाडी खाऊचे रिकामी पाकीट सापडल्याने बालविकास अधिकाऱ्यांनी केला पंचनामा                                                                          देगलूर,(संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली ते मुस्तापूर या रस्त्यात बेटकबिलोली शिवारातील नदीपात्रात गरोदर मातासाठी येणाऱ्या खाऊ ची रिकामी पाकिटे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खाऊवाटपात सुरु असलेला भ्रष्टाचार असल्याचा उघडकीस पहावयास मिळाले. बेटकबिलोली शिवारात ही पाकिटे नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीपात्रात दोन पोत्यामध्ये बांधून फेकण्यात आली होती. पण ती पोती वाहून न जाता नदीच्या किनारी आढळून आली असुन, एकूण 200 च्या वर रिकामी पाकिटे त्या पोत्यामध्ये सापडल्याने एकच सावळा गोंधळ दिसून आला आहे. या घटनेचे वृत्त समजताच नायगावचेC.D.P. Oने पंचनामा केला असता, हा खाऊ नायगाव तालुक्यात वाटप झालाच नाही. तर ही पाकिटे आली कुठून याचा शोध घेणे चालू आहे. या पाकिटामध्ये गहू ,चना, मसूरडाळ ही दिसून आल्याने या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.असे नायगावचे CDPO ने राजुरे साहेबांनी सांगितले आहे. नायगाव तालुक्यात फेब्रुवारी महिन्याअखेरीस खाऊचे वाटप झालेच नाही पण सदर रिकामी पाकिटे कोणत्या तालुक्याचे आहेत यामागचे गोडबंगाल काय आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राजूरे साहेबांनी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, गरोदर माता यांची कसून चौकशी केली जाईल असे सांगण्यात आले आहे. हे भ्रष्टाचार जे कोणी केले आहे, त्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे बोलण्यात आले आहे.

Previous articleपवार झारखंडच्या दौऱ्यावर, धोनीच्या नावावर पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न.? पाहा काय म्हणाले पवार?🛑
Next articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पुन्हा मालेगांवातील शाळा बंदचा निर्णय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.