Home Breaking News अयोध्या मधील भव्य राम मंदिर उभारणीसाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी...

अयोध्या मधील भव्य राम मंदिर उभारणीसाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी – घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं आता बंद

246

राजेंद्र पाटील राऊत

अयोध्या मधील भव्य राम मंदिर उभारणीसाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी – घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं आता बंद

राजेश एन भांगे /  युवा मराठा न्युज नेटवर्क

भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू असून राम मंदिराच्या उभारणीसाठी भारत भरातून जनतेकडून देणगी देखील स्वीकारल्या जात होत्या.
मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

या पार्श्वभूमीवर आता अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
त्यासोबतच, आत्तापर्यंत राम मंदिरासाठी अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.
३ वर्षांत मंदिर तयार होणार राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात बोलताना माहिती दिली आहे.
ते म्हणाले, “राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली आहे.

लोकांना जर देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी.
त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर ते जाऊ शकतात.
मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत.

मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
पण येत्या ३ वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल.”

Previous articleनोबेल पारितोषिक विजेते मा.कैलाश सत्यार्थी यांचेकडून जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचे अभिनंदन
Next articleदेवळा तालुक्यात कोरोणाचे चक्क एकाच दिवशी निघाले २४ पॉझिटिव्ह
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.