Home कोल्हापूर दत्त नागरी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सभा

दत्त नागरी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सभा

191

राजेंद्र पाटील राऊत

दत्त नागरी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सभा

कोल्हापूर : घुणकी ता.१८ :नवे पारगाव येथील दत्त नागरी पतसंस्थेस ७ लाख ९८ हजार रुपयांचा नफा झाला असून सभासदांना जागा खरेदी व इमारत बांधकामासाठी कर्ज रु.५ लाखांपर्यंत १३ टक्के व्याजदराने देणार असल्याचे संस्थापक प्रभाकर साळुंखे यांनी सांगितले.
नवे पारगाव येथील दत्त नागरी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सभा खेळीमेळीत झाली. यावेळी श्री. साळुंखे बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष आप्पासाहेब हुजरे होते.
दत्त व (कै.) शंकरराव साळुंखे (गुरुजी) यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. श्रध्दांजली ठरावाचे वाचन अनिल सुतार यांनी केले.
उपाध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत करुन संस्थेच्या वाठार, ताराबाई पार्क, कळंबा- कोल्हापूर येथे शाखा आहेत. २१ कोटींच्या ठेवी,१३ कोटींची कर्जे, ७ कोटींची गुंतवणूक आहे. मयत सभासदांना ५०० रुपये मदत, माफक दरात पिण्याचे पाणी, माफक दरात सभागृह भाड्याने असल्याचे सांगितले.
मँनेजर शरद जमदाडे यांनी विषयवाचन केले. सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले.
यावेळीअध्यक्ष आप्पासाहेब हुजरे, शाखाध्यक्ष कृष्णात बोरुडे, बी.डी.पाटील, एस. एस सुतार, संचालक सुर्यंकांत शिर्के, नंदकुमार मराठे, जगन्नाथ पाटील, राजेंद्रकुमार पाटील, अनिल सुतार, बाळासाहेब परीट, मोहिते सर, भारती जाधव, सल्लागार जयसिंग पाटील, बाबूराव चौगुले, युवराज शिंदे, उपस्थित होते.
संचालक सुर्यंकांत शिर्के यांनी आभार मानले.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleघुणकी येथे शिवजंयती निमित्त रक्तदान शिबीर
Next articleवाखारी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.