राजेंद्र पाटील राऊत
माननीय ना. एकनाथ भाई शिंदे साहेब (नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त मा. खासदार श्रीकांत शिंदे साहेब फाउंडेशन च्या वतीने 100 रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज शिवसेना नेते मा.ना.एकनाथ भाई शिंदे साहेब (नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री) महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त व मा.खा.श्रीकांत शिंदे साहेब फाऊंडेशन च्या वतीने 100 रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्या मध्ये आज देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी साठी 1 रुग्णवाहिका भेट म्हणून मा.ना.एकनाथ भाई शिंदे यांच्या हस्ते देगलूर-बिलोली मतदार संघाचे लाडके उत्कृष्ट संसदपटू मा.आमदार सुभाष साबणे साहेब यांच्या कडे स्पुर्द केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्राचे कृषि मंत्री मा.ना.श्री दादाजी भुसे, ठाण्याचे खासदार राजेंद्र विचारे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, युवासेना जिल्हायुवाअधिकारी विक्रम साबणे, श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे प्रमुख मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.