Home मुंबई युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्र कार्यालयाचे मुंबईत उदघाटन संपन्न!

युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्र कार्यालयाचे मुंबईत उदघाटन संपन्न!

184

राजेंद्र पाटील राऊत

युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्र
कार्यालयाचे मुंबईत उदघाटन संपन्न!
(विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबई -युवा मराठा वृतपत्र आणि न्युज चँनल महाराष्ट्रच्या मुंबई कार्यालयाचे उदघाटन काल मोठया दिमाखात व उत्साहात संपन्न झाले.
काल राजमाता जिजाऊ जयंतीदिनाचे औचित्य साधून युवा मराठा न्युज चँनलच्या कार्यालयाचे उदघाटन ठाणे शहरातील कासम आर्कड,पाचवा मजला, जांभळी नाका येथे पार पडले.भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाँ.अप्पासाहेब आहेर यांच्या हस्ते हा उदघाटन समारंभ मोठया दिमाखात व उत्साही वातावरणात साजरा झाला.
या उदघाटन सोहळा कार्यक्रमास भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बन्सीदादा डोके,युवा मराठाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत,व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव,पत्रकार जयवंत धांडे,दिलीप चव्हाण,निलेश भोये,जगदिश बधान,दावल पगारे,दिपक भावसार,विशाल बच्छाव,आंशूराज पाटील राऊत,विजय पवार,योगेश पवार मुंबई ,वैभव पाटील पालघर,अरुण कुंभार रायगड,बालाजी पाटील नांदेड,मोहन शिंदे कोल्हापूर,सिध्दांत चौधरी पुणे,राजेश कदम बीड ,कुसूमताई चंद्रमोरे कल्याण,श्री.तिरमळे सरपंच शहापूर पार्थ पवार मुंबई आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकार ओळखपरिचय कार्यक्रम पार पडला.तर मान्यंवराची समयोचीत भाषणे पार पडलीत.
कोल्हापूर येथील युवा मराठा न्युजचे ब्युरो चीफ मोहन शिंदे यांनी मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना श्रीगणेशाची प्रतिमा भेट देऊन सन्मानीत केले.
याप्रसंगी युवा मराठा न्युजच्या विभागीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांची भारतीय मराठा महासंघाच्या नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी तर मोहन शिंदे यांची कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी आणि वैभव पाटील यांची पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून यावेळी नियुक्ती करण्यात आली.
कालपासून सुरु करण्यात आलेल्या मुंबई कार्यालयाचे प्रमुख म्हणून डाँ.अप्पासाहेब आहेर यांची नियुक्ती करण्यात आली.

Previous articleव-हाणे ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ शासकीय योजनेचे तीन तेरा नऊ बारा !
Next articleमुखेड तालुक्यातील चांडोळा जिल्हा परिषद गटातील गट ब अंतर्गत चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या विविध कामांचे भूमिपूजन..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.