Home नांदेड नायगाव तालुक्यातील मौ. खैरगाव येथे १७ जानेवारीला होणार ग्रामपंचायतीची फेर निवडणूक

नायगाव तालुक्यातील मौ. खैरगाव येथे १७ जानेवारीला होणार ग्रामपंचायतीची फेर निवडणूक

216

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील मौ. खैरगाव येथे १७ जानेवारीला होणार ग्रामपंचायतीची फेर निवडणूक

नांदेड,दि. १६ – राजेश एन भांगे

नायगाव तालुक्यातील मौजे खैरगाव येथील प्रभाग क्र. ३ (क) या सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी श्रीमती ललिता शंकर घंटेवाड यांना छताचा पंखा हे चिन्ह वाटप झाल्यानंतर त्यांचे नाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नजरचुकीने मतपत्रिकेवर समाविष्ट करावयाचे राहून गेल्यामूळे जागा क्र. ३ (क) सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी झालेले मतदान रद्द करण्यात आले आहे. या जागेसाठी रविवार १७ जानेवारीला फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

मौजे खैरगाव प्रभाग क्र. ३ (क) सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी श्रीमती ललिता शंकर घंटेवाड यांना निशाणी छताचा पंखा या जागेसाठी सुधारित मतपत्रिका तयार करुन, त्यामध्ये श्रीमती ललिता शंकर घंटेवाड यांच्या नावाचा समावेश करुन या जागेच्या फेर मतदानासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही होणार आहे. १६ जानेवारीला मतदान यंत्र तयार करुन रविवार १७ जानेवारी २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार आहे तर सोमवार १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

मौजे खैरगाव प्रभाग क्र. ३ (क) सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी पार पडले असल्याने ग्रामपंचायत निवडणूकीत मधल्या बोटाला शाई लावण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. रविवार १७ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या नायगाव तालुक्यातील मौजे खैरगाव येथील प्रभाग 3 (क) या सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव जागेची फेरनिवडणुकीसाठी मतदाराच्या डाव्या हाताच्या अनामिकेस मार्करपेनने शाई लावण्यात येणार आहे याची मतदारांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleप्रथमेश महाजन यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
Next articleदेगलूर येथे श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत “श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान” विषयी बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.