Home नांदेड देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी देण्यात आले निवेदन..

देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी देण्यात आले निवेदन..

247

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी देण्यात आले निवेदन..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर शहरातील मुख्य रस्ता असलेले नवीन बस स्टँड ते अण्णाभाऊ साठे चौक येथे दोन्ही बाजूंनी अतिशय वेगाने मागच्या दोन वर्षापासून अतिक्रमण वाढत चालले असून ही बाब अतिशय गंभीर आहे. यामुळे वर्दळ साठी अरुंद रस्ता पुरत नाही अपघाताचे प्रमाण वाढत असून अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. नागरिक त्रस्त झाले असून मोजमाप करून अतिक्रमण हटविण्यात यावे शहरातील हा महत्त्वाचा रस्ता असून त्यातच वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंग केल्याने रस्ता अजून छोटा झाला आहे यामुळे होत असलेली कोंडी दिव्यांग व्यक्ती पादचारी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी अंध व्यक्ती या सर्वांचा विचार करून अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सेवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशा मागणीचे निवेदन मुख्य अधिकारी देगलूर नगरपरिषद देगलूर यांना भारतीय युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आले .

Previous articleमुखेड येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण शिबीर संपन्न..
Next articleमहाराष्ट्र राज्य महामंडळाने वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.